माझी जपान यात्रा
साल होत 2002. मी तेव्हा टाटा कंपनीत नोकरीला होतो. वेळ होती दुपारचे तीन. मला माझ्या साहेबांचा फोन आला. ते म्हणाले ताबडतोब एअर इंडिया बिल्डिंगमध्ये जा आणि अमुक अमुक व्यक्तीला भेट. त्यांच्या कडून चेन्नई चे तिकीट घे आणि सामान सुमान घेऊन दोन दिवसात चेन्नईच्या आपल्या ऑफिस ला जा. तिथे जपानचा VISA काढायला सांग. आणि VISA मिळाला कि टोकियो जपानला जा. तिथे आपल्या क्लायंट च्या ऑफिस मध्ये जा.
त्या प्रमाणे मी दोन दिवसांनी सकाळी सात च्या विमानाने मुंबई डोमेस्टिक एअरपोर्ट वरून चेन्नईला पोचलो. ऑफिसला रुजू झालो आणि कंपनीच्या गेस्ट हौस मध्ये VISA मिले पर्यंत, सात दिवस राहिलो. गेस्ट हौस मध्ये माझ्या बरोबर राहणारा मुलगा रात्री उशिरा येई. त्याची क्रिकेटची quiz असलेली पुस्तक मी वाचली. त्यावरून काही पुस्तकं घेण्याचा विचार मनात आला. त्या प्रमाणे एका मुलाच्या सांगण्या वरून चेन्नई च्या सगळ्यात मोठया पुस्तकांच्या दुकानातून हॅरी पॉटर च लेटेस्ट पुस्तकं विकत घेतलं. जपानचा VISA मिळाला आणि इंडियन एरलाईन्स चा दुपारच्या 12:30 च्या विमानाने निघालो. साडेपाच तास प्रवासाने सिंगापुर च्या Changi एअरपोर्टवर प्लेन उतरलो. हा एअरपोर्ट जगातील सर्वात सुंदर विमान talan पैकी एक आहे. मला रात्री 12:30 चे सिंगापुर एरलाईन्स चे प्लेन होत. मला प्रवासात खर्च करायला कंपनीने US$20 दिले होते. पण पैसे संपतील का ह्या भीतीने मी खर्च केले नाहीत. आमचं सिंगापुर ऎर्लिन्सच प्लेन रात्री 12:00 वाजता निघणार होत. प्लेन मध्ये सगळी माणसे Japanese किंवा Chinese मध्ये चिवचिवाट करत होती. सगळे जेवले होते आणि प्रवासात झोपणार होते. मला मात्र खूप भूक लागली होती. मी परिचारिकेला म्हटले काही खायला मेलेलं का? ती म्हणाली काही आहे का बघते. तिने मला एक मोठे Smoked Salmon Sandwich दिले. मी तिचे आभार मानले. झोप काही येत नव्हती. माझ्या पुढे एक छोटा स्क्रीन होता. त्यावर खूप movies होते. मी थोडावेळ ते बघत बसलो. 2:30 वाजता डोळा लागला. पहाटे 4:30 वाजता परिचारिकेनी मला उठवले आणि गरम टॉवेल दिला. मग चहा आला. ते झाल्यावर मला विचारण्यात आले breakfast कुठला हवा जपानी कि कॉंटिनेंटल? मी जपानी म्हटल्यावर ती खुश झाली.
प्लेन 7:00 वाजता टोकियो चा narita एअरपोर्ट वर उतरले. मी 10 मिनिटात बाहेर पडलो. पब्लिक बस नि शिंजुकू ला पोहोचलो आणि टॅक्सीनि माझंही हॉटेल रूम वर पोहोचलो. असा झाला माझं जपान प्रवास.
जपान फार सुंदर देश आहे. मी जपानला साल 2002 ला सप्टेंबर ते नव्हेम्बर असे तीन महिने होतो. टोकियो ला माझं बसतान होत. मी टोकियो मध्ये नाकानो या भागात, crystal village मध्ये राहत होतो. जपान मध्ये राहायला जागा कमी आणि माणसे जास्त आहेत. म्हणून घराची area कमी असते. मला राहिला एक मोठी खोली होती. त्यात कलर tv, फ्रिज, VCR, सोफा, गॅस ची शेगडी, microwave ओव्हन, टॉयलेट, बाथरूम, कपाट, हीटर cum A/C, टेबल, चेअर, इस्त्री करायचा बोर्ड वा इस्त्री, टीपॉय, असं सगळं होत. शिवाय एक छोटी शिडी होती जी चढल्यावर माची होती जिथे झोपायला गादी आणि पांघरूण होती. शिवाय दाराबाहेर वॉशिंग मशीन होत. मी जिथे राहायचो तिथपासून दहा मिनिटे चालून गेल्यावर एक video कॅस्सेट लायब्ररी होती. त्यामुळे मी छान movies बघितल्या उदाहरण द्यायचे तर 'North by North west', आणि 'Sound of music '.
टोकियो अगदी मुंबई सारखं आहे. इथे मेट्रो आहे. Train clockwise आणि anti clockwise एका गोलाकार मार्गावर फिरतात. दोन तीन स्टेशन नंतर एक मोठं स्टेशन येत. काही महत्वाची स्टेशन्स ची नावं आहेत Shinjuku, Shibuya, Ebisu, Ueno, इत्यादी. मुंबई मध्ये जस मुंबई सेंट्रल स्टेशन आहे तस इथे टोकियो मध्ये टोकियो स्टेशन आहे. मेट्रोचे टोकियो शहरात जाळ आहे . प्रत्येक मेट्रो लाईन एका वेगळ्या रंगाने ओळखले जात जसेकी blue, green, red, इत्यादी.
खायची आमची मजा होती. आम्ही जपानी खाणे खात नसू कारण त्याला वेगळाच वास यायचा आणि ते महाग होते. मग आम्ही मकडोनाल्डस मध्ये जेवायचो, दुपारी आणि रात्री. मी कधी तरी Kentucky Fried chicken खायचो कारण ते महाग होत. माझ्या बायकोनी मला Parampara masala पाकीट दिली होती. म्हणून मी एकदा चिकन करायचे ठरवले. Mall मधनं कापलेली आणि साफ केलेली चिकन विकत घेतली आणि parampara चा मसाला आणि चिकन मिक्स करून, मॅरीनेट करून microwave ओव्हन मध्ये शिजवले. ते शिजवल्यावर मला इतकं आवडलं की 4 दिवस मी ते चपाती बरोबर खाल्लं.
जपानच्या पहिल्या दहा दिवसात मी Shinjuku मधल्या इलेक्ट्रॉनिक दुकानातुन एक डिजिटल कॅमेरा विकत घेतला. आम्हाला शनिवारी आणि रविवारी सुटी असायची. मी शक्यतो शनिवारी घरी बसत नसे. मी अश्या वेळी टोकियोत फिरायचो.
एका दिवशी मी ठरवलं आपण टोकियो टॉवर बघावा. मी सकाळी लवकर उठलो अंघोळ केली आणि घर सोडलं. एक दोन मेट्रो ट्रेन बदलल्या आणि टोकियो टॉवर ला पोचलो. हा टॉवर Eiffel टॉवर पेक्षा उंच आणि हलका आहे. ईथे एक लिफ्ट आहे जी काही सेकंनदात खालून वर पर्यंत नेते. वरती गेला की चहू बाजूनी सगळं टोकियो शहर दिसतं. इथे छोटी दुकाने आहेत जिथे टोकियो टॉवर च्या छोट्या मोठ्या आकृती , पोस्टकार्ड, लॉकेट, रिंग्स विकली जातात. टोकियो टॉवर पाहून मन भरून गेलं. मी नवीन कॅमेऱ्याने भरपूर फोटो काढले.
मग एकदा मी Ueno ला गेलो. इथला zoo फार प्रसिद्ध आहे. नेहमी सारखा शनिवारी सकाळी निघालो. इथे zoo बरोबर museum पण आहे. प्राणिसंग्रहालयात हत्ती, पोलर बेयर, जिराफ, पाणगेंडा , वगैरे अनेक प्राणी आणि पक्षी आहेत. प्रत्येक प्राणी तो जसा एरवी राहतो तश्या वातावरणात त्याला ठेवले जाते. उदाहणार्थ पोलर बेअर च्या चहू बाजूला बर्फ आहे. प्रत्येक प्राणी इतके सुंदर आहेत का विचारू नका. ते रोगट वाटत नाहीत. अतिशय हेल्दी असतात. परत माझी खाण्याची बोंब झाली. इथे बारीक काठी मध्ये भाजलेले काही मासाचे तुकडे टोचले होते. मी इथे फक्त कोल्ड ड्रिंक प्यायला आणि घरी गेलो.
अमेरिकेचा डिस्नी वर्ल्ड जगात फार प्रसिद्ध आहे. डिस्नी वर्ल्ड टोकियो मध्ये ही आहे. सकाळी लवकर घरून निघालो सात वाजता आणि डिस्नी वर्ल्ड ला पोहोचलो साडेआठला. अनलिमिटेड तिकीट माझ्या करता घेतला आणि एका मोठ्या गेट मधून आत शिरलो. इथे डिस्नी वर्ल्ड च्या rides बद्दल माहिती होती. डिस्नी वर्ल्ड अफाट मोठे आहे. इथे लहान मुलांपासून मोठ्या माणसान पर्यंत सग्यांना आवडतील अशा गोष्टी आहेत. डिस्नी वर्ल्ड मध्ये शिरलो कि पहिले वॉल्ट डिस्नी आणि त्याचा मिकी माउस ह्यांचा ब्रॉन्झ चा पुतळा आहे. शिवाय बर्फाच्या रिंग वर मिकी माउस, डोनाल्ड डक, गुफी स्केटिंग करताना पुतळे आहेत. मध्ये सिन्ड्रेला चा कॅसल आहे. तिथे शोज दाखवतात. माझं अर्ध डिस्नी वर्ल्ड बघून झालं दोन वाजे पर्यंत. मग मोठ्या queue मध्ये उभा राहिलो रोस्टेड चिकन खायला. तीन वाजता नंबर आला. पोटात चिकन गेल्यावर बरं वाटलं. डिस्नी वर्ल्ड चा सगळ्यात सुंदर शो म्हणजे 'Its a Small World'. इथे आपण एका छोट्या बोटीत बसतो आणि आपल्या दोन्ही बाजूला जगातल्या माणसांच्या बाहुल्या त्यांचे पोशाख घातलेल्या असे दिसतात. उदाहणार्थ भारत म्हणजे ताज महाल चा पुतळा आणि तबला वाजवणाऱ्या बाहुल्या आणि नाचणारी मुलगी च्या बाहुल्या असे दाखवले होते. साडे सात ते साडे आठ इथे डिस्नी च्या पात्रांची परेड असतें आणि मग fire works असतात साडे आठ ते नऊ वाजेपर्यंत. रात्री दहाला वॉर्निंग होते सोडून जाण्याची आणि अकरा वाजता गेट बंद होत.बाहेर लगेच मेट्रो होती आणि एक तासात घरी पोचलो. अशी झाली माझी पहिली जपान ची ट्रिप.
Comments
Post a Comment