Posts

माझी जपान यात्रा

  साल होत 2002. मी तेव्हा टाटा कंपनीत नोकरीला होतो. वेळ होती दुपारचे तीन. मला माझ्या साहेबांचा फोन आला. ते म्हणाले ताबडतोब एअर इंडिया बिल्डिंगमध्ये जा आणि अमुक अमुक व्यक्तीला भेट. त्यांच्या कडून चेन्नई चे तिकीट घे आणि सामान सुमान घेऊन दोन दिवसात चेन्नईच्या आपल्या ऑफिस ला जा. तिथे जपानचा VISA काढायला सांग. आणि VISA मिळाला कि टोकियो जपानला  जा. तिथे आपल्या क्लायंट च्या ऑफिस मध्ये जा.   त्या प्रमाणे मी दोन दिवसांनी सकाळी सात च्या विमानाने मुंबई डोमेस्टिक एअरपोर्ट वरून चेन्नईला पोचलो. ऑफिसला रुजू झालो आणि कंपनीच्या गेस्ट हौस मध्ये VISA मिले पर्यंत, सात दिवस राहिलो. गेस्ट हौस मध्ये माझ्या बरोबर राहणारा मुलगा रात्री उशिरा येई. त्याची क्रिकेटची quiz असलेली पुस्तक मी वाचली. त्यावरून काही पुस्तकं घेण्याचा विचार मनात आला. त्या प्रमाणे एका मुलाच्या सांगण्या वरून चेन्नई च्या सगळ्यात मोठया पुस्तकांच्या दुकानातून हॅरी पॉटर च लेटेस्ट पुस्तकं विकत घेतलं. जपानचा VISA मिळाला आणि इंडियन एरलाईन्स चा दुपारच्या 12:30 च्या विमानाने निघालो. साडेपाच तास प्रवासाने सिंगापुर च्या Changi एअरपोर...